। लोकजागर । फलटण । दि. ३१ मार्च २०२५ ।
येथील श्री सदगुरु शिक्षण संस्था संचलित सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या उपशिक्षिका सौ. जयश्री तांबे यांचा नवोपक्रम स्पर्धेतील यशाबद्दल सातारा येथे शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांच्या हस्ते विशेष गौरव संपन्न झाला.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने घेण्यात आलेल्या नवोपक्रम स्पर्धेत सौ.जयश्री गणेश तांबे यांनी ’किशोरवयीन विद्यार्थ्यांची भाषिक कौशल्ये संवर्धन – एक चळवळ’ या विषयावर सादर केलेल्या नवोपक्रमाची राज्यस्तरावर निवड झाली होती. त्याचे सातारा येथे शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांच्या हस्ते बक्षीस वितरण संपन्न झाले. यावेळी डाएटचे माजी प्राचार्य डॉ.रामचंद्र कोरडे, डाएटचे प्राचार्य डॉ.अमोल डोंबाळे, उपशिक्षणाकारी रविंद्र खंदारे, डाएट अधिव्याख्याता विजय कोकरे, कृष्णात फडतरे, अन्नपूर्णा माळी आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान या यशाबद्दल सौ. जयश्री तांबे यांचे श्री सदगुरु शिक्षण संस्थेचे प्रमुख दिलीपसिंह भोसले, अॅड. सौ. मधुबाला भोसले, तेजसिंह भोसले, रणजितसिंह भोसले यांचेसह संस्था पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्याथी आदींसह शिक्षण क्षेत्रातून अभिनंदन करण्यात आले.