डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने रमजान ईद निमित्त इफ्तारचे आयोजन
। लोकजागर । फलटण । दि. ०२ एप्रिल २०२५ ।
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने रमजान ईद निमित्त इफ्तारचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने दलित मुस्लिम ऐक्याचे अनोखे दर्शन पहायला मिळाले.

यावेळी आरपीआयचे जिल्हा सरचिटणीस विजय येवले, मुन्ना शेख, बापूसाहेब जगताप, माजी नगरसेवक सचिन अहिवळे , हाजी नियाजहम्मद कुरेशी, हाजी शुकुर कसम कुरेशी, हाजी जाकीर आदम कुरेशी, जमील महबूब कुरेशी, अलीम रफिक कुरेशी, शकील कुरेशी, तालीफ अस्लम कुरेशी, इमरान नियाज अहमद कुरेशी, मुक्तार नियाज अहमद कुरेशी, कराड नगरपालिका स्वच्छता निरीक्षक मुकेश अहिवळे, लॉ कॉलेज मालेगावचे प्राचार्य डॉ. वर्धमान अहिवळे, पत्रकार सचिन मोरे, अनिल पिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
रमजान महिन्यात मुस्लिम बांधव उपवास करतात. उपवास सोडण्यासाठी रोजा इफ्तारचे आयोजन केले जाते. या महिन्यातील अखेरचे पाच ते सहा दिवस रात्रभर जागून प्रार्थना केली जाते. रात्रभर जागल्यानंतरही मुस्लिम बांधव या इफ्तार पार्टीला उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळाच्या वतीने इफ्तारचे आयोजन शहरात प्रथमच करण्यात आल्याने अनेक मुस्लिम बांधवांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन जयंती मंडळास अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळाच्या वतीने मुस्लिम बांधवांना रमजान ईद निमित्त महापुरुषांच्या पुस्तकांची भेट देण्यात आली. यावेळी विविध मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.
यावेळी डॉ. आंबेडकर जयंती मंडळाच्यावतीने गणेश भि.अहिवळे, अजय का.काकडे, गोविंद प्र.काकडे, सुरज वी.काकडे, भूषण बनसोडे, सिद्धार्थ र. अहिवळे, चंद्रकांत म.मोहिते, मंगेश प.सावंत, कपिल नं. काकडे आदी सदस्य उपस्थित होते.