फलटण शहरात आज अ‍ॅड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन

। लोकजागर । फलटण । दि. ०३ एप्रिल २०२५ ।

फलटण शहरातील प्रभाग क्रमांक १२ मध्ये आज दिनांक ०३ एप्रिल २०२५ रोजी सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अ‍ॅड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या हस्ते विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा महायुतीच्या मार्फत आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती महायुती फलटण तालुका यांच्यावतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

आज दिनांक ०३ रोजी सायंकाळी ५ : १५ वाजता शहरातील डी.एड. चौक येथे श्रीमंत मालोजीराजे पुतळा ते डी.एड. चौक अंतर्गत रस्ता डांबरीकरण कामाचे भूमिपूजन व त्यानंतर सायंकाळी ५ : ३० वाजता बारवबाग येथे नाना – नानी पार्क उभारणी व अभ्यासिका उभारणी कामाचे भूमिपूजन अ‍ॅड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

तरी या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन फलटण तालुका महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून करण्यात आले आहे.

Spread the love