डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पिंपरद येथे आज रक्तदान शिबिराचे आयोजन

| लोकजागर | फलटण | दि. १४ एप्रिल २०२५ |

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समिती पिंपरद (ता. फलटण ) यांच्या वतीने व अक्षय ब्लड बँक फलटण यांच्या सहकार्याने पिंपरद ता. फलटण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये दिनांक १४ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या रक्तदान शिबिराचे उद्घाटन तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांच्या हस्ते होणार असून यावेळी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक यांची उपस्थिती असणार आहे. या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी जास्तीत जास्त रक्तदान करावे असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समिती पिंपरदच्या वतीने करण्यात आले आहे.

Spread the love