| लोकजागर | फलटण | दि. ०७ मे २०२५ |
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ, पुणे यांच्या माध्यमातून फेब्रुवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून कनिष्ठ महाविद्यालय व किमान कौशल्य (व्यवसाय शिक्षण) विभागातून फलटण तालुक्यात २ हजार ९८६ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी ७९ विशेष प्राविण्यात, ५०४ प्रथम श्रेणीत, १५७८ द्वितीय श्रेणीत, ५७० उत्तीर्ण श्रेणीत असे एकूण २ हजार ७३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तालुक्याचा निकाल ९१.४६ टक्के लागला आहे. दरम्यान तालुक्यातील पाच विद्यालयांचा निकाल १००% लागला आहे. यामध्ये वेणूताई चव्हाण कन्या कनिष्ठ महाविद्यालय – फलटण, वेणूताई चव्हाण हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय – तरडगाव, प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेन्ट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज – कोळकी, हाजी अब्दुल रज्जाक उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय – फलटण, सरदार वल्लभभाई कनिष्ठ महाविद्यालय – साखरवाडी या विद्यालयांचा समावेश आहे.

फलटण तालुक्याचा सविस्तर निकाल याप्रमाणे –
मुधोजी महाविद्यालय, फलटण येथून कला, वाणिज्य, शास्त्र शाखेतून ४८९ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी १२ विद्यार्थी विशेष प्राविण्यात, ४८ प्रथम श्रेणीत, २६० द्वितीय श्रेणीत, १२२ उत्तीर्ण श्रेणीत असे एकूण ४४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ९०.३८ टक्के लागला आहे.
सरदार वल्लभभाई कनिष्ठ महाविद्यालय, साखरवाडी येथून कला, वाणिज्य शाखेतून ५७ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी १ विद्यार्थी विशेष प्राविण्यात, ७ प्रथम श्रेणीत, २४ द्वितीय श्रेणीत, १६ उत्तीर्ण श्रेणीत असे एकूण ४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ८४.२१ टक्के लागला आहे.
यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय, फलटण येथून कला, वाणिज्य, शास्त्र शाखेतून ५०६ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी ४ विद्यार्थी विशेष प्राविण्यात, ४५ प्रथम श्रेणीत, २१० द्वितीय श्रेणीत, १५९ उत्तीर्ण श्रेणीत असे एकूण ४१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ८२.६० टक्के लागला आहे.
मुधोजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, फलटण येथून कला, वाणिज्य, शास्त्र शाखेतून ८२२ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी ३५ विद्यार्थी विशेष प्राविण्यात, २२१ प्रथम श्रेणीत, ४५५ द्वितीय श्रेणीत, ८६ उत्तीर्ण श्रेणीत असे एकूण ७९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ९६.९५ टक्के लागला आहे.
मालोजीराजे शेती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, फलटण येथून शास्त्र शाखेतून ५७३ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी १७ विद्यार्थी विशेष प्राविण्यात, ११७ प्रथम श्रेणीत, ३७० द्वितीय श्रेणीत, ६३ उत्तीर्ण श्रेणीत असे एकूण ५६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ९८.९५ टक्के लागला आहे.
छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय, गिरवी येथून कला शाखेतून २२ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी ५ प्रथम श्रेणीत, ७ द्वितीय श्रेणीत, ६ उत्तीर्ण श्रेणीत असे एकूण १८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ८१.८१ टक्के लागला आहे.
सौ. वेणूताई चव्हाण कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, फलटण येथून कला शाखेतून ७० विद्यार्थीनी परीक्षेस बसल्या त्यापैकी १ विद्यार्थीनी विशेष प्राविण्यात, ७ प्रथम श्रेणीत, ३५ द्वितीय श्रेणीत, १८ उत्तीर्ण श्रेणीत असे एकूण ६१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ८७.१४ टक्के लागला आहे.
ज्योतिर्लिंग हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, पवारवाडी आसू येथून कला शाखेतून ३२ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी ४ प्रथम श्रेणीत, ११ द्वितीय श्रेणीत, ९ उत्तीर्ण श्रेणीत असे एकूण २४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ७५ टक्के लागला आहे.
फलटण हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, फलटण येथून कला शाखेतून २४ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी १० द्वितीय श्रेणीत, ७ उत्तीर्ण श्रेणीत असे एकूण १७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ७०.८३ टक्के लागला आहे.
जय भवानी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, तिरकवाडी येथून कला शाखेतून २३ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी ३ प्रथम श्रेणीत, १६ द्वितीय श्रेणीत, ३ उत्तीर्ण श्रेणीत असे एकूण २२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ९५.६५ टक्के लागला आहे.
सरस्वती माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बिबी येथून कला शाखेतून २४ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी १ विद्यार्थी विशेष प्राविण्यात, ३ प्रथम श्रेणीत, १३ द्वितीय श्रेणीत, ५ उत्तीर्ण श्रेणीत असे एकूण २२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ९१.६६ टक्के लागला आहे.
हनुमान माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गोखळी येथून कला शाखेतून १६ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी १ विद्यार्थी विशेष प्राविण्यात, ० प्रथम श्रेणीत, ७ द्वितीय श्रेणीत, ३ उत्तीर्ण श्रेणीत असे एकूण ११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ६८.७५ टक्के लागला आहे.
श्रीमती प्रेमलाताई चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय, फलटण येथून कला शाखेतून २६ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी १२ द्वितीय श्रेणीत, १० उत्तीर्ण श्रेणीत असे एकूण २२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ८४.६१ टक्के लागला आहे.
महात्मा फुले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, सासवड येथून कला शाखेतून १९ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी १ प्रथम श्रेणीत, ३ द्वितीय श्रेणीत, १३ उत्तीर्ण श्रेणीत असे एकूण १७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ८९.४७ टक्के लागला आहे.
सरलष्कर श्रीमंत बाबाराजे खर्डेकर कनिष्ठ महाविद्यालय, हनुमंतवाडी येथून कला शाखेतून १७ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी १ प्रथम श्रेणीत, २ द्वितीय श्रेणीत, ३ उत्तीर्ण श्रेणीत असे एकूण ६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ३५.२९ टक्के लागला आहे.
हनुमंतराव पवार हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, फलटण येथून कला शाखेतून २८ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी २ प्रथम श्रेणीत, ७ द्वितीय श्रेणीत, १४ उत्तीर्ण श्रेणीत असे एकूण २३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ८२.१४ टक्के लागला आहे.
मॉडर्न हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, बरड येथून कला शाखेतून २८ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी १३ द्वितीय श्रेणीत, ११ उत्तीर्ण श्रेणीत असे एकूण २४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ८५.७१ टक्के लागला आहे.
श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, फलटण येथून शास्त्र शाखेतून ३३ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी ५ प्रथम श्रेणीत, १९ द्वितीय श्रेणीत, ७ उत्तीर्ण श्रेणीत असे एकूण ३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ९३.९३ टक्के लागला आहे.
वेणूताई चव्हाण हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, तरडगाव येथून कला व वाणिज्य शाखेतून २३ विकद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी ३ प्रथम श्रेणीत, १२ द्वितीय श्रेणीत, ८ उत्तीर्ण श्रेणीत असे एकूण २३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल १००.०० टक्के लागला आहे.
श्री जानाई हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, राजाळे येथून कला, वाणिज्य शाखेतून ९ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी २ प्रथम श्रेणीत, ४ द्वितीय श्रेणीत, १ उत्तीर्ण श्रेणीत असे एकूण ७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ७७.७७ टक्के लागला आहे.
ॲम्बीशन इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, आदर्की येथून वाणिज्य, शास्त्र शाखेतून ३९ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी ४ विद्यार्थी विशेष प्राविण्यात, ११ प्रथम श्रेणीत, २१ द्वितीय श्रेणीत, २ उत्तीर्ण श्रेणीत असे एकूण ३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ९७.४३ टक्के लागला आहे.
प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेन्ट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कोळकी येथून वाणिज्य शाखेतून ५ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी १ विद्यार्थी विशेष प्राविण्यात, ३ प्रथम श्रेणीत, १ द्वितीय श्रेणीत असे एकूण ५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल १००.०० टक्के लागला आहे.
हाजी अब्दुल रज्जाक उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, फलटण येथून कला शाखेतून ३ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी १ द्वितीय श्रेणीत, २ उत्तीर्ण श्रेणीत असे एकूण ३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल १००.०० टक्के लागला आहे.
सरदार वल्लभभाई कनिष्ठ महाविद्यालय, साखरवाडी येथून किमान कौशल्य अभ्यासक्रम ५ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी १ विद्यार्थी विशेष प्राविण्यात, ४ द्वितीय श्रेणीत असे एकूण ५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल १००.०० टक्के लागला आहे.
यशवंतराव चव्हाण कॉलेज, फलटण येथून किमान कौशल्य अभ्यासक्रम ४६ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी १ विद्यार्थी विशेष प्राविण्यात, ५ प्रथम श्रेणीत, ३० द्वितीय श्रेणीत, १ उत्तीर्ण श्रेणीत असे एकूण ३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ८०.४३ टक्के लागला आहे.
मुधोजी हायस्कूल, फलटण येथून किमान कौशल्य अभ्यासक्रम १९ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी ९ प्रथम श्रेणीत, ९ द्वितीय श्रेणीत असे एकूण १८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ९४.७३ टक्के लागला आहे.
मालोजीराजे शेती विद्यालय, फलटण येथून किमान कौशल्य अभ्यासक्रम २३ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी १ प्रथम श्रेणीत, १८ द्वितीय श्रेणीत, उत्तीर्ण श्रेणीत १ असे एकूण २० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ८६.९५ टक्के लागला आहे.
वेणूताई चव्हाण कन्या कनिष्ठ महाविद्यालय, फलटण येथून किमान कौशल्य अभ्यासक्रम ,५ विद्यार्थीनी परीक्षेस बसल्या त्यापैकी १ प्रथम श्रेणीत, ४ द्वितीय श्रेणीत असे एकूण ५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल १००.०० टक्के लागला आहे.