। लोकजागर । सातारा । दि. ११ मे २०२५ ।
माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवा पत्नी तथा अवलंबितास कळविण्यात येते की, त्यांचे विविध अडीअडचणींचा निपटारा करणेकामी माहे मे 2025 मध्ये कल्याण संघटकाच्या तालुका दौर्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर दौर्याचा तपशील याप्रमाणे –
कराड – गोरखनाथ जाधव कल्याण संघटक, सैनिकी मुलांचे वसतिगृह कराड दि.20 मे 2025 (मो. 7889661527)
फलटण – रामचंद्र जाधव -तहसिल कार्यालय, दि. 23 मे 2025 (मो. 7798422366),
खटाव – लालचंद कुभांर कल्याण संघटक,तहसिल कार्यालय, खटाव (वडुज) दि. 27 मे 2025 (मो. 9011138943)
तरी या संधीचा लाभ संबधित लाभार्थ्यांनी घेण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सातारा यांनी केले आहे.