मालोजीराजे विद्यालय व जुनिअर कॉलेज, लोणंद चा निकाल ९०.३३ टक्के

। लोकजागर । लोणंद । दि. १२ मे २०२५ ।

येथील रयत शिक्षण संस्थेच्या मालोजीराजे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज लोणंद चा बारावीचा निकाल 90.33 टक्के लागला असून कला शाखेचा निकाल 72.50 टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल 98.48 टक्के तर विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के लागला आहे. तर, अनुक्रमे पडळकर बाळू मारुती, कु. अडसूळ करिना संजय व कु. सोनवणे शरयू सुभाष या विद्यार्थ्यांनी प्रत्येक विभागात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

कला शाखेचा निकाल 72.50 टक्के लागला असून पडळकर बाळू मारुती (73.33) याने प्रथम, रासकर सुजल अनिल(69.50) याने दुसरा तर ठोंबरे आर्यन ज्ञानेश्वर (68.00) याने तिसरा क्रमांक पटकावला आहे. वाणिज्य शाखेचा निकाल 98.48 टक्के लागला असून कु. अडसूळ करिना संजय (87.17) हिने प्रथम, कु. शिंदे ईश्वरी शंकर (85.67) हिने दुसरा व कु. अडसूळ प्रिती पोपट (82.67)हिने तिसरा क्रमांक पटकाविला आहे.तर विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के लागला असून कु. सोनवणे शरयू सुभाष(78.33) हिने प्रथम, कु. धुमाळ प्रणाली दादासो (76.67) हिने दुसरा व कु. जगताप आदिती संतोष (74.00) हिने तिसरा क्रमांक पटकाविला आहे.

त्यांच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य मिलिंद माने, सातारा जिल्हा परिषद माजी समाज कल्याण सभापती आनंदराव शेळके, स्कूल कमिटी सदस्य डॉ. अजितकुमार वर्धमाने, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व पदाधिकारी तसेच मालोजीराजे विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य तथा रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य चंद्रकांत जाधव, उपप्राचार्यआबाजी धायगुडे, विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थी व विद्यार्थिनींचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Spread the love