‘कृषीसेवा रत्न’ सचिन जाधव यांना ‘महात्मा फुले गौरव पुरस्कार’

। लोकजागर । फलटण । दि. १३ मे २०२५ ।

महात्मा फुले विचार अभियानाच्या वतीने कृषी सेवा रत्न श्री सचिन जाधव यांना महात्मा फुले गौरव पुरस्कार 2025 चा स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले फलटण येथील उपळेकर मंदिर येथे झालेल्या महात्मा फुले गुणगौरव कार्यक्रमध्ये क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले विचार मंचचे अध्यक्ष तुकाराम कोकाटे यांच्या हस्ते कृषि सेवारत्न सचिन जाधव यांचा महात्मा फुले गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला.

यावेळी जेष्ठ पत्रकार रवींद्र बेडकीहाळ, सामाजिक कार्यकर्ते संपतराव जाधव साहित्य सर्जाकार सुरेश शिंदे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी त्रिशताब्दी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बापूराव सूळ, सुजन फाउंडेशनचे अध्यक्ष अजित जाधव आदी मान्यवराच्या उपस्थित देण्यात आला.

सचिन जाधव यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन त्यांना महात्मा फुले गौरव पुरस्कार सन्मान करण्यात आला आहे. सन्मान युवा मनाचा, गौरव फुले विचारांचा याप्रमाणे काही कर्तुत्वान व्यक्तींचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला.

महाराष्ट्र शासन कृषी विभागाचा सर्वोच्च पुरस्कार मानला जाणारा कृषि सेवा रत्न पुरस्कार देऊन राज्यपालच्या हस्ते सचिन जाधव यांना गौरविण्यात आलेे आहे. ते सातारा जिल्ह्यातील पहिले कृषी सेवा रत्न पुरस्कार प्राप्त आहेत. महाराष्ट्रात पहिले फळांचे गाव धुमाळवाडी करण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे.

Spread the love