महेंद्र बेडके यांची दिशा समितीच्या सदस्यपदी नियुक्ती

। लोकजागर । फलटण । दि. १४ मे २०२५ ।

जिल्हा विकास समन्वय व देखरेख समिती अर्थात सातारा जिल्हास्तरीय दिशा समितीच्या सदस्य पदी राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी – बेडके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवण्यतात येणार्‍या सर्व योजनांच्या देखरेखीसाठी दिशा समिती कार्यरत आहे. ज्यामुळे योजना प्रभावीपणे राबवता येतात. सातारा जिल्हास्तरीय दिशा समितीचे अध्यक्षपदी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आहेत. सहअध्यक्ष म्हणून खासदार धैर्यशील मोहिते -पाटील हे कामकाज बघत आहेत. जिल्हास्तरीय दिशा समितीचे सचिव म्हणून जिल्हाधिकारी आहेत. जिल्हास्तरीय सर्व विभागाचे प्रमुख हे समितीचे सदस्य आहेत.

दरम्यान, या निवडीबद्दल महेंद्र सूर्यवंशी – बेडके यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

Spread the love