। लोकजागर । फलटण । दि. 02 जून 2025 ।
भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष, ‘ग्राहक ही समिती’ या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीपकुमार कैलास जाधव यांनी त्यांच्या समर्थकांसह शिवसेना एकनाथ शिंदे गटात यशवंतराव चव्हाण सभागृह कराड येथे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री पर्यटन खनिज काम व माजी सैनिक कल्याण मंत्री ना. शंभूराजे देसाई, सातारा जिल्ह्याचे शिवसेना संपर्कप्रमुख शरद कणसे व शिवसेना सातारा जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव यांच्या उपस्थिती पक्ष प्रवेश केला.

सदर पक्षप्रवेशावेळी बोलताना ना. शंभुराज देसाई यांनी, “संदीपकुमार जाधव व त्यांचे सहकारी यांच्या प्रवेशामुळे फलटण शहर व तालुक्यामध्ये शिवसेना पक्षाची ताकद वाढणार आहे. त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पक्ष वाढीसाठी काम करावे. संघटन मजबूत करावे. त्यांचे भविष्य चांगले असेल”, असे सांगून भावी वाटचालीस सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या.

शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे यांचे विचार तसेच पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाने प्रभावित होऊन शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे संदीपकुमार जाधव यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांच्या समवेत प्रकाश नांदेले, स्वाती फुलारी, प्रकाश बोधे – इनामदार , ऋषिकेश नलावडे, आनंद सुतार, अनुप पवार, तुषार फरतडे, शरद बनकर, प्रेम घाडगे अशा अनेक कार्यकर्त्यांना शिवसेना पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला.
यावेळी उपजिल्हाप्रमुख अविनाश फडतरे, विधानसभा संघटक विराज खराडे, तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर पवार, तालुका प्रमुख नानासो इवरे, तालुकाप्रमुख हेमंत सुतार, शहर प्रमुख निलेश तेलखडे, गणेश चोरमले उपस्थित होते.