| लोकजागर | फलटण | दि. २२ मे २०२५ |
कुरवली, ता. फलटण येथील ओंकार वृद्धाश्रमातील ग्रंथालयास साहित्यप्रेमी सेवाभावी फाउंडेशनचे अध्यक्ष ताराचंद्र आवळे यांच्या वतीने कथा, कादंबरी, चरित्र, कविता, ललित लेख अशा पंचवीस पुस्तकांचा संच भेट देण्यात आला. तसेच ज्येष्ठ साहित्यिक ‘सर्ज्या’कार सुरेश शिंदे यांनीही आपली पुस्तके भेट दिली.
यावेळी दीपक दोशी, व्ही. जी. माने, प्रभाकर भोसले, प्रा. विक्रम आपटे, सुभाष देशपांडे, महादेवराव गुंजवटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सुरेश शिंदे, ताराचंद्र आवळे यांनी मनोगत व्यक्त करून वृद्धाश्रमामध्ये राबवल्या जाणाऱ्या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.
वृद्धाश्रमातील ज्येष्ठ सदस्य श्री. जोशी यांनी वृद्धाश्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून पुस्तके भेट दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य शांताराम आवटे यांनी केले तर आभार प्राचार्य अर्जुन रुपनवर यांनी मानले.
यावेळी वृद्धाश्रमातील ज्येष्ठ सदस्यांचा शाल व गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.