सातारा जिल्ह्यातील सैनिकी मुला/मुलींचे वसतिगृहात तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने अशासकीय पदभरती

। लोकजागर । सातारा । दि. २२ मे २०२५ ।

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सातारा अखत्यारीत सैनिकी मुला/मुलींचे वसतिगृह, सातारा, कराड व पाटण याकरीता अशासकीय पदे तात्पुरत्या स्वरूपात निव्वळ कंत्राटी पद्धतीने भरावयाची आहेत. तरी इच्छुक उमेदवारानी आपले अर्ज दिनांक २० जून २०२५ पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सातारा येथे जमा करावेत असे आवाहन ले. कर्नल हंगे स. दै. (नि.), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सातारा यांनी केले  आहे.

अशासकीय पदाचा तपशील खालील प्रमाणे 

सहाय्यक वसतीगृह  अधीक्षक / अधीक्षिका सैनिकी मुलांचे वसतिगृह सातारा येथे  पुरुष 2 चौकीदार 1 सफाई कामगार 2 माळी 1 स्वयंपाकी महिला 5 सैनिकी मुलींचे वसतिगृह सातारा सहाय्यक वसतिगृह  अधीक्षिका 1 महिला, चौकीदार 1 सफाई कामगार,2 माळी 1 स्वयंपाकी महिला 3, सैनिकी मुलांचे वसतीगगृह  कराड सहाय्यक वस्तीगृह अधीक्षक  2 पुरुष, चौकीदार 1 सफाई कामगार 2 माळी 1 स्वयंपाकी महिला 5, सैनिकी मुलांचे वस्तीगृह पाटण चौकीदार एक. माजी सैनिक व माजी सैनिक विधवांना प्राधान्य देण्यात येईल असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्री हंगे यांनी कळविले आहे.

Spread the love