| लोकजागर | फलटण | दि. २५ मे २०२५ |
ऑल इंडिया सैनिक स्कूलच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता सहावी प्रवेश परीक्षेत येथील रूजल सागर फाळके हिने घवघवीत यश संपादन केले आहे.तिची अंबिकापूर छत्तीसगड येथील सैनिक स्कूलसाठी निवड झाली आहे.

रूजलचे वडील सागर दिगंबर फाळके हे पंजाब येथे,तर चुलते आकाश दिगंबर फाळके बेंगलोर येथे भारतीय सैन्यदलात कार्यरत आहेत.तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
रुजल हिने हे यश तिचे दिवंगत आजोबा कै. दिगंबर गजानन फाळके यांना समर्पित केल्याची भावना व्यक्त केली.