| लोकजागर | फलटण | दि. २५ मे २०२५ |
येथील सामाजिक कार्यकर्ते अरुण खरात यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व ज्येष्ठ नेते दिलीपसिंह भोसले यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.

फलटण नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका सौ. ज्योती खरात यांचे अरुण खरात हे पती असून शहरातील दत्त नगर, स्वामी विवेकानंद नगर, भडकमकरनगर परिसरात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. यावेळी बोलताना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, ‘‘अरुण खरात यांच्यासारखा तळागाळात काम करणारा कार्यकर्ता हा भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यामुळे भारतीय जनता पार्टीची ताकद नक्कीच वाढली आहे. यापुढे त्यांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहोत.’’
सदर पक्षप्रवेशावेळी स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत नाईक निंबाळकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, माजी नगरसेवक अशोकराव जाधव, युवा नेते रणजितसिंह भोसले, भाजपा नेते अमोल सस्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.