ऋतुजा किशोर पवार हिची महाराष्ट्र कुस्ती संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड

| लोकजागर | फलटण | दि. २५ मे २०२५ |

मुधोजी महाविद्यालय फलटणची महिला कुस्तीपटू ऋतुजा किशोर पवार हिची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये महाराष्ट्र कुस्ती संघाची मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे. या राष्ट्रीय (महिला) कुस्ती स्पर्धा पलवाल, हरियाणा येथे ठिकाणी होणार आहेत.

ऋतुजा किशोर पवार हिची महाराष्ट्र कुस्ती संघाची मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल तिचे व तिला मार्गदर्शन करणारे कुस्ती क्रीडा प्रशिक्षक यांचे फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा विधान परिषदेचे माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे क्रीडा समितीचे अध्यक्ष शिवाजीराव घोरपडे,प्रशासन अधिकारी अरविंद निकम,तपासणी अधिकारी श्री दिलीप राजगुडा,मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एच. कदम आदींसह महाविद्यालयाचे शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Spread the love