। लोकजागर । फलटण । दि. 26 जून 2025 ।
येथील क्रांतीसुर्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे औचित्य साधुन कापशी येथील लोकमान्य मेडिकल फौंडेशनला वारकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या मोफत औषधोपचार शिबिरासाठी मोफत औषधांचा पुरवठा करण्यात आला. यावेळी डॉ. अनंत मोरे, क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे संचालक विनय नेवसे, प्रकाश इनामदार यांची प्रमुख उपस्थिती होती.

क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद नेवसे यांच्या माध्यमातुन वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणार्या अनेकांना क्रांतीसुर्य प्रतिष्ठानच्यावतीने भरघोस मदत करण्यात येते. याच पार्श्वभूमीवर लोकमान्य मेडिकल फौंडेशनच्या माध्यमातून कापशी येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्ताने डॉ. बी. के. यादव यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अनंत मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत राबवण्यात येणाऱ्या मोफत औषधोपचार शिबिरासाठी क्रांतीसुर्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोफत औषधांचा पुरवठा करण्यात आला आहे.

