अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संघटना फलटण केंद्राच्या आरोग्य सेवेस वारकर्‍यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

। लोकजागर । फलटण । दि. 30 जून 2025 ।

अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संघटना नाशिक, केंद्र फलटण यांचे मार्फत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त ओमकार अपार्टमेंट, ब्राह्मण गल्ली, फलटण येथे राबवण्यात आलेया मोफत दवाखाना व औषध उपचार केंद्रास वारकर्‍यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

दि. 28 रोजी सकाळी 9 वाजता या मोफत दवाखान्याचे उद्घाटन प्रसिद्धी अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी, क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे प्रमुख मिलिंद नेवसे, सीए प्रवीण आवटे व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या मोफत दवाखाना उपक्रमास डॉक्टर श्रीपाद चिटणीस, डॉक्टर जयंत जगदाळे, डॉक्टर त्रिपुटे, डॉक्टर दत्तात्रय देशपांडे, डॉक्टर सुहास म्हेत्रे, डॉक्टर अरुण अभंग, डॉक्टर प्रसाद जोशी, डॉक्टर निकम, डॉक्टर बुरुंगले, डॉ.अवधुत गुळवणी इत्यादी डॉक्टरांनी वारकर्‍यांची तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार दिले.

या उपक्रमास क्रांतीसुर्य प्रतिष्ठान, फलटण मेडिकल असोसिएशन आणि एम.आर. संघटना यांनी मोफत औषधोपचार दिले. या उपक्रमास संघटनेचे वैभव विष्णुप्रद, नंदकुमार केसकर, चंद्रशेखर दाणी, निरंजन क्षीरसागर, डॉ. माधुरी दाणी, स्वानंद जोशी, निखिल केसकर इत्यादी संघटनेच्या पदाधिकार्‍यांचे सहकार्य मिळाले. या उपक्रमाचा सुमारे पंधराशेच्यावर वारकर्‍यांनी लाभ घेतला.

Spread the love