हरी नामाच्या गजरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन

धर्मपुरी येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले पालखीचे स्वागत

। लोकजागर । धर्मपुरी । दि. 01 जुलै 2025 ।

आषाढी वारी सोहळ्यात विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन आळंदी येथून निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे काल दिनांक 30 रोजी सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी येथे आगमन झाले. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पालखीचे स्वागत करून माऊलीच्या पादुकांचे सपत्नीक मनोभावे दर्शन घेतले.

धर्मपुरी येथे पालखी स्वागतासाठी पालकमंत्री श्री. गोरे यांच्यासह माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार धैर्यशील मोहिते – पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते – पाटील, मा.आमदार राम सातपुते, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम, अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकुर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर, अमित माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संतोष नवले यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Spread the love