। लोकजागर । फलटण । दि. 16 जुलै 2025 ।
सहकार महर्षी कै. हणमंतराव दि. पवार यांच्या 28 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त श्रीराम शेतकरी कामगार सहकारी ग्राहक संस्था लि; फलटण अर्थात श्रीराम बझार येथे गुरुवार, दिनांक 17 जुलै रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

श्रीराम बझार मुख्य शाखा येथे सकाळी 10 वाजता कै. हणमंतराव पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येणार असून त्यानंतर दीपप्रज्वलनाने रक्तदान शिबीराचे उद्घाटन बझारचे माजी चेअरमन तथा विद्यमान ज्येष्ठ संचालक महादेवराव पवार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी बझारचे चेअरमन जितेंद्र पवार, व्हाईस चेअरमन दिलीपसिंह भोसले यांच्यासह संचालक, सभासद उपस्थित राहणार आहेत.

तसेच यावेळी बझारच्या शाखांना नफ्यावरील इन्सेंटिव्हचे वाटप, सन 2025 च्या उत्तम शाखा पुरस्काराचे वितरण, निवृत्त सेवकांचा सत्कार, आदर्श सेवक, सेविका पुरस्कार 2025 चे वितरण, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आदी कार्यक्रम संपन्न होणार आहेत.
