। लोकजागर । फलटण । दि. 29 जुलै 2025 ।
साहित्यप्रेमी सेवाभावी फाऊंडेशन फलटण, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा फलटण, वनविभाग फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 27 जुलै 2025 रोजी येथील ‘नाना – नानी पार्क’ मध्ये ‘साहित्यिक संवाद कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माणदेशी साहित्य ताराचंद्र आवळे यांनी करून कविता सादर केली. युवा कवी अविनाश चव्हाण, प्रा. अशोक माने यांनीही कवितांचे सादरीकरण केले. हरिराम पवार यांनी अभंगाचे गायन केले.

प्राचार्य रवींद्र येवले यांनी कारगिल युद्धामध्ये ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांच्याप्रती आदरांजली व्यक्त करून त्यातील काही आठवणींना उजाळा दिला व त्यांच्या अश्रू ची किंमत आपण कधी मोजणार यावरती भाष्य केले. प्रा. सुधीर इंगळे यांनीही सातारा जिल्ह्यातील सैनिकांनी दिलेल्या योगदानावरती प्रकाश टाकला. प्राचार्य शांताराम आवटे यांनी संवाद खरोखर काळाची गरज आहे हे स्पष्ट करून आपण नेहमी इतरांप्रती सदाचारी व विवेकवादी वागले पाहिजे असे स्पष्ट केले.
आभार प्रा. श्रेयस कांबळे यांनी मानले.
