फलटण – स्वारगेट विना थांबा एसटी सेवा १ ऑगस्टपासून पुन्हा सुरू !

| लोकजागर | फलटण | दि. ३१ जुलै २०२५ |

फलटणकर प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. काही काळासाठी बंद करण्यात आलेली फलटण – स्वारगेट, स्वारगेट – फलटण विना वाहक, विना थांबा एसटी बस सेवा पुन्हा एकदा सुरू होत आहे. ही सेवा १ ऑगस्ट २०२५ पासून नियमितपणे सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती फलटण एस.टी. आगाराकडून देण्यात आली.

ही बस सेवा कामावर जाणाऱ्या प्रवाशांसाठी, विद्यार्थी वर्गासाठी आणि पुणे-फलटण दरम्यान दररोज प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
या सेवेला पुन्हा सुरू करण्यासाठी अनेक नागरिकांनी मागणी केली होती, आणि ती अखेर मान्य झाली आहे.

सेवेची प्रमुख वैशिष्ट्ये:
विना थांबा सेवा: थेट फलटणहून स्वारगेट (पुणे) पर्यंत व स्वारगेट (पुणे) हून फलटण पर्यंत

या बससेवेसाठी प्रौढांसाठी प्रत्येकी ₹ १८७ तर बालकांना प्रत्येकी ₹ ९६ तिकीटदर आकारण्यात येणार असून प्रवासदरात महिला व ज्येष्ठ नागरिकांना ५०% तर अमृत ज्येष्ठ नागरिकांना १००% सवलत लागू असणार आहे.

प्रस्थान वेळा:
फलटण – स्वारगेट : सकाळी ७ वाजलेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रत्येक तासाला.

स्वारगेट – फलटण : सकाळी १० वाजलेपासून रात्री ८ वाजेपर्यंत प्रत्येक तासाला.

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी स्थानिक एसटी प्रशासनाने प्रवाशांनी वेळेत आगारात हजर राहून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Spread the love