। लोकजागर । फलटण । दि. 5 ऑगस्ट 2025 ।
फलटण तालुका शारिरीक शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी दशरथ लोखंडे तर सचिवपदी आप्पासाहेब वाघमोडे यांची निवड झाली.

फलटण तालुका शारिरीक शिक्षक संघटनेची वार्षिक बैठक कोल्हापूर विभागीय अध्यक्ष आर वाय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीमध्ये पुढील तीन वर्षासाठी फलटण तालुक्याची नूतन कार्यकारणी निवडण्यात आली.

फलटण तालुका अध्यक्षपदी श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व जुनिअर कॉलेज फलटणचे दशरथ लोखंडे, उपाध्यक्षपदी मुधोजी महाविद्यालय ज्युनिअर कॉलेज फलटणचे तायाप्पा शेंडगे, सचिवपदी क्रांतिसिंह नाना पाटील हायस्कूल सरडे चे श्री . आप्पासाहेब वाघमोडे, खजिनदारपदी कांतीलाल शेंडगे, कार्याध्यक्ष प्रदीप जाधव, संघटक सचिन धुमाळ व पंकज पवार, संदीप ढेंबरे यांची निवड करण्यात आली.

सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी नितिन तारळकर, फलटण तालुका क्रीडा अधिकारी सुमीत पाटील, व सौ सुप्रिया गाढवे, पोलिस निरीक्षक कदम, संघटनेचे माजी अध्यक्ष काशिनाथ सोनवलकर जनार्दन पवार, जिल्हा समन्वयक उत्तम घोरपडे यांच्यासह संघटनेचे फलटण तालुक्यातील सर्व शारिरीक शिक्षक उपस्थित होते. या सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले.
फलटण तालुका शारीरिक शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी दशरथ लोखंडे यांची निवड झाल्याबद्दल मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, सचिव समशेरसिंह नाईक निंबाळकर, उपाध्यक्ष बाळासाहेब भोसले, संचालक अजित गायकवाड, राजेंद्र नागटिळे, प्राचार्य रणदेव खराडे यांच्यासह सर्व शिक्षक यांनी लोखंडे यांचे अभिनंदन केले.