। लोकजागर । खंडाळा, । दि.५ ऑगस्ट, २०२५ ।
खंडाळा तालुका क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी विजय नारायण गाढवे यांची, तर सचिवपदी चंद्रकांत शिवाजीराव भोईटे यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल, पसरणी येथे पार पडलेल्या बैठकीत करण्यात आली.

शालेय शिक्षण क्रीडा विभाग आणि जिल्हा क्रीडा परिषद, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने महाबळेश्वर, वाई आणि खंडाळा या तालुक्यांतील क्रीडा शिक्षकांसाठी तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. याच बैठकीत सातारा जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आर. वाय. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली खंडाळा तालुका संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली.

नवनिर्वाचित कार्यकारिणी खालीलप्रमाणे आहे:
- अध्यक्ष: श्री. विजय नारायण गाढवे
- कार्याध्यक्ष: श्री. सुनील सुदाम कानडे
- उपाध्यक्ष: श्री. निलेश रावसाहेब मुळीक आणि महादेव वामन शेडगे
- सचिव: श्री. चंद्रकांत शिवाजीराव भोईटे
- सहसचिव: श्री. विशाल विलास कोरडे
- खजिनदार: सौ. वनिता श्रीरंग भंडलकर
- संघटक: श्री. रमेश धर्माजी पिसाळ
याव्यतिरिक्त, श्री. राहुल बाळासो अडसूळ, श्री. विवेक फुलचंद तळेकर, सौ. दिपाली महादेव चव्हाण, श्री. विनोद रामचंद्र कुंभार आणि श्री. जितेंद्र श्रीराम गाढवे यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. नितीन तारळकर, कोल्हापूर विभागीय क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्री. आर.वाय.जाधव, उपाध्यक्ष डॉ. महेंद्र भोसले, सहसचिव श्री. राजेंद्र माने, सातारा जिल्हा संघटनेचे सचिव श्री. मनोहर यादव, सहसचिव श्री. महेंद्र गाढवे आणि सर्व जिल्हा कार्यकारिणी सदस्यांनी अभिनंदन केले आहे.
