| लोकजागर | फलटण | दि. १६ ऑगस्ट २०२५ |
शहरातील सर्वात जुना आणि मानाचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शुक्रवार पेठ तालीम गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रितम चंद्रकांत बेंद्रे (आबा) यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. नुकत्याच पार पडलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत मंडळाची संपूर्ण कार्यकारिणी बिनविरोध निवडण्यात आली.

गुरुवारी (दि. १४) मंडळाच्या आगामी वर्षाच्या पदाधिकारी निवडीसाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्री. राहुल जगन्नाथ निंबाळकर होते. सुरुवातीला मावळते खजिनदार श्री. बाळासाहेब भट्टड यांनी गतवर्षीचा जमाखर्च सादर केला. त्यानंतर मावळते अध्यक्ष श्री. फिरोज आतार यांनी नवीन कार्यकारिणीच्या निवडीचा प्रस्ताव मांडला, ज्यास श्री. निलेश खानविलकर आणि श्री. श्रीकांत पालकर यांनी अनुमोदन दिले.

बैठकीत अध्यक्षपदासाठी श्री. प्रितम बेंद्रे यांचे एकमेव नाव पुढे आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यासोबतच इतर पदाधिकाऱ्यांचीही निवड एकमताने पार पडली.
मंडळाची नूतन कार्यकारिणी खालीलप्रमाणे:
- अध्यक्ष: श्री. प्रितम चंद्रकांत बेंद्रे (आबा)
- उपाध्यक्ष: श्री. नरेश पालकर, श्री. विजय पोतदार, श्री. सुमित मठपती
- सेक्रेटरी: श्री. अमित कर्वे (बाप्पा), श्री. राजेंद्र चंद्रकांत कर्वे, श्री. हुजेफ मणेर
- खजिनदार: श्री. बाळासाहेब रमाकांत भट्टड, श्री. राहुल जगन्नाथराव निंबाळकर (काका)
या निवडीबद्दल सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
