| लोकजागर | पुणे | दि. १७ ऑगस्ट २०२५ |
सामाजिक जाणिवेला प्राधान्य देत, भारती विद्यापीठाच्या १९९६ च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी माई बालभवन येथील अंध मुला-मुलींसाठी मदतीचा उपक्रम राबवला. १७ ऑगस्ट २०२५ रोजी देहूरोडजवळील मामुर्डी गावात असणाऱ्या माई बालभवनमध्ये आयोजित केलेल्या या कार्यक्रमात, ३४ अंध मुले-मुली तसेच प्रौढ महिलांना गरजेच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले. यात अशा मुलीही होत्या ज्या फुटबॉल खेळाडू आहेत.

माजी विद्यार्थ्यांनी या वसतिगृहाला धान्य, वैद्यकीय औषधे, आणि एक वैद्यकीय किट भेट दिले. याशिवाय, एका गरजू मुलीची संपूर्ण शैक्षणिक फी भरून तिच्या पुढील शिक्षणाचा मार्ग सुकर केला. या उपक्रमामुळे माई बालभवनमधील मुलींना, मुलांना मोठा आधार मिळाला असून, या कार्याने समाजात एक सकारात्मक संदेश गेला आहे.

या सामाजिक कार्यात माजी विद्यार्थिनी नीलम गोंधळी, आणि माजी विद्यार्थी योगेश इंगवले, अमित तुरुकमारे, शैलेश सणस, अभिजीत भिलारे, अमित कंधारे, श्रीकांत राऊत, धीरज येणपुरे, विनोद शिवणकर, तसेच अमर सोमवंशी यांनी सक्रिय सहभाग घेतला. माई बालभवनचे प्रमुख मधुकर इंगळे यांनी माजी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
