| लोकजागर | सातारा | दि. २२ ऑगस्ट २०२५ |
“महाराष्ट्राने दख्खनी राजकारण स्वीकारणे ही काळाची गरज आहे,” असे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व मुंबई विद्यापीठाचे माजी विभागप्रमुख प्रा. डॉ. नीरज हातेकर यांनी व्यक्त केले. ते कॉ. शेख काका व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त साताऱ्यात आयोजित ‘सामाजिक चळवळी पुढील आव्हाने’ या कार्यक्रमात बोलत होते.

हातेकर यांनी सांगितले की, सध्याच्या राजकारणात धर्माचा प्रभाव नियोजित पद्धतीने वाढवला जात आहे. उदारीकरणानंतर बेरोजगारी, महागाई, स्थानिक प्रश्न गंभीर झाले असून, हिंदुत्ववाद्यांनी धर्म, जात व इतिहास यांचा उपयोग करून अस्मितावादी राजकारण पुढे नेले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. शिवाजीराव पाटील होते. प्रास्ताविक मीनाज सय्यद यांनी केले तर सूत्रसंचालन विजय मांडके यांनी केले. यावेळी प्रा. डॉ. आर. के. चव्हाण, प्रा. डॉ. तांबोळी, प्रा. डॉ. भास्कर कदम, निलिमा हांडे कदम, किशोर बेडकीहाळ, दिनकर झींब्रे, राजन कुंभार, एड. वसंतराव नलावडे, एड. राजेंद्र गलांडे, कॉ. श्याम चिंचणे, कॉ. माणिक अवघडे, विनायक आफळे, प्रा. विकास यलमार, रफिक शेख, प्रमोद परामणे, दिलीप भोसले, प्रा. संजीव बोंडे, नारायण जावलीकर, मच्छिंद्र जाधव, डॉ. दीपक माने, प्रशांत पोतदार, उदय चव्हाण आदी उपस्थित होते.
प्रारंभी कॉ. शेख काका व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करून अभिवादन गीत सादर करण्यात आले.
