शिंदेवाडीतील भगत कुटुंबाची अनोखी गौरी सजावट – जुन्या पितळी भांड्यांनी उजाळल्या आठवणी

| लोकजागर | फलटण | दि. सप्टेंबर २०२५ |

शिंदेवाडी गावातील कुमारी वैदीका आणि कुमारी वैभवी या भगत बहिणींनी यंदाच्या गौरी पूजनानिमित्त पारंपरिक पितळी भांडी व दुर्मिळ घरगुती वस्तूंचा सुंदर उपयोग करून अप्रतिम सजावट केली. या सजावटीसाठी गावातील महिलांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून कौतुकाचा वर्षाव केला.

या सजावटीत वापरलेली पितळी भांडी व जुन्या घरगुती वस्तूंनी घरातील पूर्वीच्या पिढ्यांच्या आठवणींना उजाळा मिळाला. सजावट पाहताना उपस्थितांनी “जुनं तेच सोनं” असे शब्द उच्चारत पारंपरिक वारसा जपल्याबद्दल भगत कुटुंबाचे अभिनंदन केले.

या उपक्रमासाठी आदित्य भगत यांनी विशेष मदत केली. वैभवी आणि वैदीका या सचिन भगत व समीर भगत (नाणी संग्रहक व अभ्यासक) यांच्या पुतण्या असून या कुटुंबाने ऐतिहासिक ठेवा काळजीपूर्वक जतन करून ठेवला आहे.

Spread the love