| लोकजागर | फलटण | दि. १४ सप्टेंबर २०२५ |
बारामतीतील पहिले हृदयरोगतज्ज्ञ (कार्डियोलॉजिस्ट) डॉ. सनी शिंदे यांनी आता फलटणमध्ये आपले स्वतंत्र हॉस्पिटल सुरू केले आहे. ‘आशा हार्ट क्लिनिक’ या नावाने सुरू झालेल्या या रुग्णालयामुळे फलटण व आजूबाजूच्या भागातील रुग्णांना उत्तम हृदयरोग तज्ज्ञाची सेवा मिळणार आहे.

डॉ. शिंदे हे बारामतीतील पहिले व वरिष्ठ हृदयरोगतज्ज्ञ असून त्यांना हृदयविकार उपचार क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी आपल्या व्यावसायिक सेवेद्वारे अनेक रुग्णांचे प्राण वाचवले आहेत. आता फलटण व सातारा जिल्ह्यातील रुग्णांसाठीही ही सुविधा उपलब्ध झाली आहे.
स्थानिक पातळीवर अशा प्रकारचे हृदयविकारतज्ज्ञांचे दवाखाने उपलब्ध नसल्यामुळे, आतापर्यंत नागरिकांना, सातारा, पुणे किंवा बारामती येथे उपचारासाठी जावे लागायचे. मात्र, आता ‘आशा हार्ट क्लिनिक’मुळे फलटणकरांसाठी ही मोठी दिलासा देणारी बाब ठरणार आहे, असा विश्वास रुग्णालय व्यवस्थापनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
रुग्णालयाचा पत्ता :
आशा हार्ट क्लिनिक,
पद्मावती कॉम्प्लेक्स, शिंगणापूर रोड, भुजबळ मळा शेजारी
पोस्ट कोळकी, बँक ऑफ महाराष्ट्र जवळ,
ता. फलटण, जि. सातारा – ४१५५२३.
मोबाईल : ९२७०२०१२४२

