। लोकजागर । फलटण । दि. २२ नोव्हेंबर २०२५ ।
फलटण नगरपालिका निवडणुकीतील बहुचर्चित लोकनियुक्त नगराध्यक्षपदाची निवडणूक अखेर दुरंगी होणार असल्याचे काल (उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी) स्पष्ट झाले आहे. नगराध्यक्षपदासाठी दाखल झालेल्या एकूण चार उमेदवारांपैकी दोन उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतल्यामुळे, आता नगराध्यक्षपदाचा थेट आणि प्रतिष्ठेचा सामना श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर विरुद्ध समशेरसिंह नाईक निंबाळकर असा फलटणकरांना पहायला मिळणार आहे.
उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी दोन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने, नगराध्यक्षपदाची लढत आता दोन प्रमुख नाईक निंबाळकर गटांमध्ये विभागली गेली आहे. एका बाजूला शिवसेनेच्या (राजे गट) वतीने श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर तर दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टी-राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे (खासदार गट) समशेरसिंह नाईक निंबाळकर आमनेसामने उभे ठाकले आहेत. फलटण शहराच्या राजकीय इतिहासात ही लढत अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
नगराध्यक्षपदासोबतच नगरसेवकपदाच्या निवडणुकीचे चित्रही आता स्पष्ट झाले आहे. नगरपालिकेच्या २७ जागांसाठी सुरुवातीला १०७ उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. त्यातील तब्बल ३१ अर्ज काल माघारी घेण्यात आले आहेत. या माघारीनंतर आता ७६ उमेदवार नगरसेवकपदाच्या २७ जागांसाठी निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब आजमावणार आहेत.
उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर होत असलेल्या लढती खालीलप्रमाणे –
नगराध्यक्ष पद –
समशेरसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर – भारतीय जनता पार्टी
श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर – शिवसेना
प्रभाग क्रमांक 1 –
अ) अनुसूचित जाती (महिला) –
लक्ष्मी प्रमोद आवळे – शिवसेना
अपुर्वा प्रथमेश चव्हाण – अपक्ष
नर्मदा किसन पवार – अपक्ष
अस्मिता भिमराव लोंढे – अपक्ष
ब) सर्वसाधारण –
सुमन रमेश पवार – शिवसेना
सोमाशेठ गंगाराम जाधव – अपक्ष
देविदास किसन पवार – अपक्ष
प्रभाग क्रमांक 2 –
अ) अनुसूचित जाती (महिला) –
आरती जयकुमार रणदिवे – शिवसेना
मिना जिवन काकडे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
सोनाली संग्राम अहिवळे – अपक्ष
ब) सर्वसाधारण –
सुपर्णा सनी अहिवळे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
अनिकेत राहुल अहिवळे – शिवसेना
कुणाल किशोर काकडे- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
प्रभाग क्रमांक 3 – अ) अनुसूचित जाती –
सचिन रमेश अहिवळे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
सिद्धार्थ दत्ता अहिवळे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)
पुनम सुनिल भोसले – शिवसेना
आशय हनमंत अहिवळे – अपक्ष
सुनिल जनार्दन निकुडे – इंडियन नॅशनल काँग्रेस
ब) सर्वसाधारण (महिला) –
सुलक्षन जितेंद्र सरगर – भारतीय जनता पार्टी
सुषमा हेमंत ननावरे – शिवसेना
प्रभाग क्रमांक 4 – अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला –
रुपाली सुरज जाधव – शिवसेना
हेमलता चंद्रकांत नाईक – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
ब) सर्वसाधारण –
राहुल जगन्नाथ निंबाळकर – भारतीय जनता पार्टी
अजारुद्दिन ताजुद्दीन शेख – शिवसेना
प्रभाग क्रमांक 5 –
अ) अनुसूचित जाती (महिला) –
कांचन दत्तराज व्हटकर – भारतीय जनता पार्टी
योगेश्वरी मंगेश खंदारे – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
सुरेखा श्रीकांत व्हटकर – शिवसेना
ब) सर्वसाधारण –
रोहीत राजेंद्र नागटीळे – भारतीय जनता पार्टी
विजय हरिभाऊ लोंढे (पाटील) – शिवसेना
शुभांगी मुकुंद गायकवाड – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
प्रभाग क्रमांक 6 –
अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) –
किरण देवदास राऊत – भारतीय जनता पार्टी
दिपक अशोक कुंभार – शिवसेना
ब) सर्वसाधारण महिला –
मंगलादेवी पृथ्वीराज नाईक निंबाळकर – भारतीय जनता पार्टी
अमिता सदाशिव जगदाळे – शिवसेना
प्रभाग क्रमांक 7 –
अ) सर्वसाधारण (महिला) –
स्वाती राजेंद्र भोसले – भारतीय जनता पार्टी
लता विलास तावरे – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
कर्णे श्रीदेवी गणेश – शिवसेना
ब) सर्वसाधारण –
अशोक जयवंतराव जाधव – भारतीय जनता पार्टी
पांडुरंग मानसिंगराव गुंजवटे – शिवसेना
प्रभाग क्रमांक 8 –
अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) –
फिरोज शहानवाज आत्तार – भारतीय जनता पार्टी
विशाल उदय तेली – शिवसेना
ब) सर्वसाधारण महिला –
सिद्धाली अनुप शहा – भारतीय जनता पार्टी
शितल धनंजय निंबाळकर – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार
सुवर्णा अमरसिंह खानविलकर – शिवसेना
प्रभाग क्रमांक 9 –
अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला –
रझीया मेहबुब मेटकरी – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
कविता श्रीराम मदने – अपक्ष
मंगल अशोक मोहळकर – अपक्ष
ब) सर्वसाधारण –
सचिन चंद्रकांत गानबोटे – अपक्ष
अमोल प्रकाश भोईटे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
सुरज हिंदुराव कदम – अपक्ष
पंकज चंद्रकांत पवार – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
प्रभाग क्रमांक 10 –
अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला –
जयश्री रणजीत भुजबळ – अपक्ष
रेहाना बशीर मोमीन – भारतीय जनता पार्टी
श्वेता किशोर ताराळकर – शिवसेना
ब) सर्वसाधारण –
अमित अशोक भोईटे – भारतीय जनता पार्टी
गणेश सुर्यकांत शिरतोडे – शिवसेना
मोनिका महादेव गायकवाड – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
प्रभाग क्रमांक 11 –
अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) –
संदिप दौलतराव चोरमले – भारतीय जनता पार्टी
कृष्णाथ मल्हारी चोरमले – शिवसेना
अमिर गनिम शेख – अपक्ष
2) सर्वसाधारण महिला –
प्रियांका युवराज निकम – शिवसेना
प्रियदर्शनी रणजितसिंह भोसले – भारतीय जनता पार्टी
प्रभाग क्रमांक 12 –
अ) अनुसूचित जाती –
अरुण हरिभाऊ खरात – भारतीय जनता पार्टी
विकास वसंतराव काकडे – शिवसेना
ओम प्रकाश पाटोळे – अपक्ष
ब) सर्वसाधारण महिला –
नताशा रोहन पवार – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार
स्मिता संगम शहा – शिवसेना
स्वाती हेमंत फुले – भारतीय जनता पार्टी
प्रभाग क्रमांक 13 –
अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला –
मोहिनी मंगेश हेंद्रे – भारतीय जनता पार्टी
सानिया फिरोज बागवान – कृष्णा – भिमा विकास आघाडी
पाकीजा अमिर शेख – अपक्ष
ब) सर्वसाधारण महिला –
रुपाली अमोल सस्ते – भारतीय जनता पार्टी
निर्मला शशिकांत काकडे – अपक्ष
क) सर्वसाधारण –
सचिन सुभाषराव सुर्यवंशी बेडके – अपक्ष
राहुल अशोक निंबाळकर – राष्ट्रवादी काँग्रेस
मनोज दत्तात्रय शेडगे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार
