परशुराम व शारदा पुरस्कारांचे वितरण १८ डिसेंबरला

लोकजागर, फलटण, दि.८ डिसेंबर २०२५ : अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था, फलटणतर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या परशुराम पुरस्कार व शारदा पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन यंदा १८ डिसेंबर रोजी नवलबाई मंगल कार्यालय येथे करण्यात आल्याची माहिती केंद्र प्रमुख विजय ताथवडकर यांनी दिली.

वेदमूर्ती कै. काशिनाथ पंत वादे यांच्या स्मरणार्थ प्रदान केला जाणारा परशुराम पुरस्कार यावर्षी सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. प्रसाद जोशी तसेच अमेरिका येथे कार्यरत असलेले डॉ. प्रसन्न जोशी यांना सन्मानपूर्वक देण्यात येणार आहे. तर शारदा पुरस्कार दापोली येथील शिक्षणतज्ञ व मानसोपचार तज्ञ सौ. धनश्री जोशी-दांडेकर यांना प्रदान करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीनिवास दाते तर प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील बालरोगतज्ञ सौ. संध्याताई भिडे उपस्थित राहणार आहेत.

या पुरस्कार वितरण समारंभास संस्थेचे पदाधिकारी, सभासद व निमंत्रितांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केंद्रप्रमुख विजय ताथवडकर यांनी केले.

Spread the love