। लोकजागर । फलटण । रोहित वाकडे । दि. २१ डिसेंबर २०२५ ।
संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या फलटण नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून, निकालाअंती फलटण शहरावर असणारी ‘राजे गटाची’ प्रदीर्घ सत्ता अखेर संपुष्टात आली आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या आक्रमक नेतृत्वात भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. लोकनियुक्त नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदाच्या २७ पैकी १८ जागांवर (२ अपक्षांच्या पाठिंब्यासह) युतीने झेंडा फडकवत पालिकेत स्पष्ट बहुमत प्रस्थापित केले आहे. दुसरीकडे, प्रस्थापित शिवसेना-राजे गटाच्या आघाडीला केवळ ९ जागांवर समाधान मानावे लागले आहे.
नगराध्यक्षपदाच्या अत्यंत अटीतटीच्या लढतीत भाजपाचे समशेरसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी १६,४८९ मते मिळवत शिवसेनेच्या श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांचा ६०० मतांनी पराभव केला. अनिकेतराजे यांना १५,८८९ मते मिळाली. विजयाची ही परंपरा प्रभागांमध्येही कायम राहिली. प्रभाग १ मध्ये अपक्ष उमेदवार अस्मिता लोंढे आणि सोमाशेठ जाधव यांनी बाजी मारली, तर प्रभाग २ मध्ये राष्ट्रवादीच्या मीना काकडे आणि सुपर्णा अहिवळे यांनी विजय मिळवला. प्रभाग ३ मध्ये राष्ट्रवादीचे सचिन अहिवळे आणि भाजपाच्या सुलक्षणा सरगर विजयी झाल्या. प्रभाग ४ मध्ये शिवसेनेच्या रूपाली जाधव आणि अजारुद्दीन शेख यांनी आघाडी कायम राखली, मात्र प्रभाग ५ मध्ये भाजपाच्या कांचन व्हटकर आणि रोहित नागटिळे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवून शिवसेनेला धक्का दिला.
प्रभाग ६ मध्ये किरण राऊत यांनी अवघ्या २ मतांनी थरारक विजय मिळवला, तर मंगलादेवी नाईक निंबाळकर यांनीही आपले वर्चस्व सिद्ध केले. प्रभाग ७ मध्ये भाजपाच्या स्वाती भोसले आणि शिवसेनेचे पांडुरंग गुंजवटे विजयी झाले. प्रभाग ८ मध्ये शिवसेनेचे विशाल तेली आणि भाजपाच्या सिद्धाली शहा यांनी आपापल्या जागा जिंकल्या. प्रभाग ९ मध्ये अपक्ष कविता मदने आणि काँग्रेसचे पंकज पवार यांनी विजय मिळवला. प्रभाग १० मध्ये शिवसेनेच्या श्वेता ताराळकर आणि भाजपाचे अमित भोईटे विजयी झाले. प्रभाग ११ मध्ये संदीप चोरमले आणि प्रियदर्शनी भोसले या भाजपा उमेदवारांनी विजयश्री खेचून आणली. प्रभाग १२ मध्ये शिवसेनेच्या विकास काकडे आणि स्मिता शहा यांनी वर्चस्व राखले, तर शेवटच्या प्रभाग १३ मध्ये भाजपाच्या मोहिनी हेंद्रे, रूपाली सस्ते आणि राष्ट्रवादीच्या राहुल निंबाळकर यांनी युतीचे पारडे जड केले.
या निकालाने फलटणच्या राजकारणात मोठे सत्तांतर घडले असून, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या रणनीतीने ‘राजे गटा’चा बालेकिल्ला काबीज केला आहे. सत्तेच्या या फेरबदलामुळे आता शहराच्या विकासाची नवीन समीकरणे मांडली जाणार आहेत.
उमेदवारांना मिळालेली मते या प्रमाणे –
नगराध्यक्ष पद –
समशेरसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर – भारतीय जनता पार्टी – 16,489 (विजयी – मताधिक्य – 600)
श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर – शिवसेना – 15889
नोटा – 341
प्रभाग क्रमांक 1 –
अ) अनुसूचित जाती (महिला) –
अस्मिता भिमराव लोंढे – अपक्ष – 889 (विजयी – मताधिक्य – 191)
लक्ष्मी प्रमोद आवळे – शिवसेना – 698
नर्मदा किसन पवार – अपक्ष – 531
अपुर्वा प्रथमेश चव्हाण – अपक्ष – 55
नोटा – 9
ब) सर्वसाधारण –
सोमाशेठ गंगाराम जाधव – अपक्ष – 1,116 (विजयी – मताधिक्य – 521)
सुमन रमेश पवार – शिवसेना – 595
देविदास किसन पवार – अपक्ष – 450
नोटा – 21
प्रभाग क्रमांक 2 –
अ) अनुसूचित जाती (महिला) –
मिना जिवन काकडे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – 980 (विजयी – मताधिक्य – 37)
सोनाली संग्राम अहिवळे – अपक्ष – 943
आरती जयकुमार रणदिवे – शिवसेना – 568
नोटा – 27
ब) सर्वसाधारण –
सुपर्णा सनी अहिवळे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – 1,466 (विजयी – मताधिक्य – 557)
अनिकेत राहुल अहिवळे – शिवसेना – 909
कुणाल किशोर काकडे- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) – 110
नोटा – 33
प्रभाग क्रमांक 3 – अ) अनुसूचित जाती –
सचिन रमेश अहिवळे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – 1,265 (विजयी – मताधिक्य – 477)
पुनम सुनिल भोसले – शिवसेना – 788
सुनिल जनार्दन निकुडे – इंडियन नॅशनल काँग्रेस – 84
आशय हनमंत अहिवळे – अपक्ष – 78
सिद्धार्थ दत्ता अहिवळे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) – 69
नोटा – 31
ब) सर्वसाधारण (महिला) –
सुलक्षणा जितेंद्र सरगर – भारतीय जनता पार्टी – 1,334 (विजयी – मताधिक्य – 410)
सुषमा हेमंत ननावरे – शिवसेना – 924
नोटा – 57
प्रभाग क्रमांक 4 – अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला –
रुपाली सुरज जाधव – शिवसेना – 1,818 (विजयी – मताधिक्य – 686)
हेमलता चंद्रकांत नाईक – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – 1,132
नोटा – 57
ब) सर्वसाधारण –
अजारुद्दिन ताजुद्दीन शेख – शिवसेना – 1,858 (विजयी – मताधिक्य – 760)
राहुल जगन्नाथ निंबाळकर – भारतीय जनता पार्टी – 1,098
नोटा – 51
प्रभाग क्रमांक 5 –
अ) अनुसूचित जाती (महिला) –
कांचन दत्तराज व्हटकर – भारतीय जनता पार्टी – 1857 (विजयी – मताधिक्य – 1,108)
योगेश्वरी मंगेश खंदारे – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – 144
सुरेखा श्रीकांत व्हटकर – शिवसेना – 749
नोटा – 41
ब) सर्वसाधारण –
रोहीत राजेंद्र नागटीळे – भारतीय जनता पार्टी – 1,863 (विजयी – मताधिक्य – 1,115)
विजय हरिभाऊ लोंढे (पाटील) – शिवसेना – 748
शुभांगी मुकुंद गायकवाड – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – 141
नोटा – 39
प्रभाग क्रमांक 6 –
अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) –
किरण देवदास राऊत – भारतीय जनता पार्टी – 1,156 (विजयी – मताधिक्य – 2)
दिपक अशोक कुंभार – शिवसेना – 1,154
नोटा – 31
ब) सर्वसाधारण महिला –
मंगलादेवी पृथ्वीराज नाईक निंबाळकर – भारतीय जनता पार्टी – 1,350 (विजयी – मताधिक्य – 400)
अमिता सदाशिव जगदाळे – शिवसेना – 950
नोटा – 41
प्रभाग क्रमांक 7 –
अ) सर्वसाधारण (महिला) –
स्वाती राजेंद्र भोसले – भारतीय जनता पार्टी – 1,153 (विजयी – मताधिक्य – 215)
लता विलास तावरे – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – 93
कर्णे श्रीदेवी गणेश – शिवसेना – 938
नोटा – 23
ब) सर्वसाधारण –
पांडुरंग मानसिंगराव गुंजवटे – शिवसेना – 1,153 (विजयी – मताधिक्य – 117)
अशोक जयवंतराव जाधव – भारतीय जनता पार्टी – 1,036
नोटा – 18
प्रभाग क्रमांक 8 –
अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) –
विशाल उदय तेली – शिवसेना – 1,535 (विजयी – मताधिक्य – 453)
फिरोज शहानवाज आत्तार – भारतीय जनता पार्टी – 1,082
नोटा – 49
ब) सर्वसाधारण महिला –
सिद्धाली अनुप शहा – भारतीय जनता पार्टी – 1,456 (विजयी – मताधिक्य – 377)
सुवर्णा अमरसिंह खानविलकर – शिवसेना – 1079
शितल धनंजय निंबाळकर – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार – 104
नोटा – 2
प्रभाग क्रमांक 9 –
अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला –
कविता श्रीराम मदने – अपक्ष – 1,409 (विजयी – मताधिक्य – 161)
रझीया मेहबुब मेटकरी – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – 1248
मंगल अतुल मोहळकर – अपक्ष – 31
नोटा – 23
ब) सर्वसाधारण –
पंकज चंद्रकांत पवार – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – 1,061 (विजयी – मताधिक्य – 20)
अमोल प्रकाश भोईटे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – 1,041
सुरज हिंदुराव कदम – अपक्ष – 463
सचिन चंद्रकांत गानबोटे – अपक्ष – 117
नोटा – 29
प्रभाग क्रमांक 10 –
अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला –
श्वेता किशोर ताराळकर – शिवसेना – 1,210 (विजयी – मताधिक्य – 91)
रेहाना बशीर मोमीन – भारतीय जनता पार्टी – 1,119
जयश्री रणजीत भुजबळ – अपक्ष – 214
नोटा – 41
ब) सर्वसाधारण –
अमित अशोक भोईटे – भारतीय जनता पार्टी – 1,605 (विजयी – मताधिक्य – 744)
गणेश सुर्यकांत शिरतोडे – शिवसेना – 861
मोनिका महादेव गायकवाड – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार 74
नोटा – 44
प्रभाग क्रमांक 11 –
अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) –
संदिप दौलतराव चोरमले – भारतीय जनता पार्टी – 1,064 (विजयी – मताधिक्य – 162)
कृष्णाथ मल्हारी चोरमले – शिवसेना – 902
अमिर गनिम शेख – अपक्ष – 89
नोटा – 8
ब) सर्वसाधारण महिला –
प्रियदर्शनी रणजितसिंह भोसले – भारतीय जनता पार्टी – 1,082 (विजयी – मताधिक्य – 133)
प्रियांका युवराज निकम – शिवसेना – 949
नोटा – 32
प्रभाग क्रमांक 12 –
अ) अनुसूचित जाती –
विकास वसंतराव काकडे – शिवसेना – 1,523 (विजयी – मताधिक्य – 425)
अरुण हरिभाऊ खरात – भारतीय जनता पार्टी 1,098
ओम प्रकाश पाटोळे – अपक्ष – 17
नोटा – 26
ब) सर्वसाधारण महिला –
स्मिता संगम शहा – शिवसेना – 1,374 (विजयी – मताधिक्य – 283)
स्वाती हेमंत फुले – भारतीय जनता पार्टी – 1,091
नताशा रोहन पवार – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार – 138
नोटा – 61
प्रभाग क्रमांक 13 –
अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला –
मोहिनी मंगेश हेंद्रे – भारतीय जनता पार्टी – 1,330 (विजयी – मताधिक्य – 95)
सानिया फिरोज बागवान – कृष्णा – भिमा विकास आघाडी – 1235
पाकीजा अमिर शेख – अपक्ष – 62
नोटा – 43
ब) सर्वसाधारण महिला –
रुपाली अमोल सस्ते – भारतीय जनता पार्टी – 1,578 (विजयी – मताधिक्य – 535)
निर्मला शशिकांत काकडे – अपक्ष – 1,043
नोटा – 49
क) सर्वसाधारण –
राहुल अशोक निंबाळकर – राष्ट्रवादी काँग्रेस – 1,527 (विजयी – मताधिक्य – 488)
सचिन सुभाषराव सुर्यवंशी बेडके – अपक्ष – 1,039
मनोज दत्तात्रय शेडगे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार – 79
नोटा – 25
