। लोकजागर । फलटण । दि. ३१ डिसेंबर २०२५ ।
महाराष्ट्र शासनाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत फलटणचे आमदार सचिन पाटील आणि सर्व विभागांतील प्रशासकीय अधिकारी नीरा देवघर लाभ क्षेत्रातील गावांचा दौरा करणार आहेत. हा दौरा ३ जानेवारी ते ८ जानेवारी २०२६ या कालावधीत पार पडणार असून, याद्वारे शासकीय योजनांची माहिती आणि लाभ थेट ग्रामस्थांच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचवला जाणार आहे. या दौऱ्यात महायुतीतील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नियोजित वेळापत्रकाप्रमाणे उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दौऱ्याच्या नियोजनानुसार, ३ जानेवारी रोजी दुपारी ४ ते रात्री ८ या वेळेत कापडगाव, कोरेगाव, चव्हाणवाडी आणि आरडगाव या गावांना भेटी दिल्या जातील. ४ जानेवारी रोजी दोन सत्रांत दौरा होणार असून सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सासवड, तरडगाव, विठ्ठलवाडी व काळज या गावांत, तर दुपारी ४ ते रात्री ८ या वेळेत डोंबाळवाडी, तडवळे, खराडेवाडी, घाडगेमळा आणि सुरवडी या गावांमध्ये कार्यक्रम होतील. ५ जानेवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या सत्रात नांदल, निंभोरे, काशीदवाडी, ढवळेवाडी या गावांचा दौरा होईल, तर दुपारी ४ ते रात्री ८ या वेळेत फरांदवाडी, मिरगाव, खडकी आणि मुळीकवाडी या गावांमध्ये संवाद साधला जाईल. ६ जानेवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत चौधरवाडी, भिलकटी, वडजल , वाठार निंबाळकर, तावडी येथे, तर दुपारी ४ ते रात्री ८ या वेळेत जाधववाडी, ठाकूरकी, कुरवली खुर्द आणि विंचुर्णी या गावांमध्ये दौरा पार पडेल.
दौऱ्याच्या उत्तरार्धात ७ जानेवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत कोळकी, झिरपवाडी भाडळी बु/खुर्द आणि तिरकवाडी या गावांना भेटी दिल्या जातील, तर दुपारी ४ ते रात्री ८ या वेळेत सोनवडी बु/खुर्द, वडले, नाईकबोमवाडी आणि शेरेशिंदेवाडी या गावांचा दौरा होईल. शेवटच्या दिवशी म्हणजेच ८ जानेवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत धूळदेव, विडणी, पिंप्रद आणि निंबळक/वाजेगाव येथे दौरा होईल. या दौऱ्याची सांगता दुपारी ४ ते रात्री ८ या वेळेत बरड/बागेवाडी, गुणवरे, मुंजवडी, राजुरी आणि कुरवली बु/दत्तनगर या गावांच्या भेटीने होणार आहे. प्रशासकीय अधिकारी प्रत्यक्ष गावात येणार असल्याने लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांचे आणि ग्रामस्थांचे अनेक प्रलंबित प्रश्न तातडीने सुटण्यास मदत होणार आहे.
