फलटणच्या यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये पर्यावरणपूरक होळी साजरी

। लोकजागर । फलटण । दि. १४ मार्च २०२५ ।

येथील श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यात आली.

प्रशालेचे प्राचार्य एस. बी. थोरात, उपप्राचाय पी. डी. घनवट यांच्या हस्ते पर्यावरण पूरक होळी पेटवण्यात आली. याप्रसंगी शिक्षक व विद्यार्थ्यांनी प्लास्टिक विरोधी घोषणा दिल्या. यामध्ये ‘प्लॅस्टिकला करा हद्दपार, मिळवा आनंद अपार’, ‘प्लास्टिक मुक्त होळी, आरोग्यदायी सोहळा’, ‘प्लास्टिक दूर करूया, पर्यावरण वाचवूया’, ‘कापडी पिशवी मौल्यवान, पर्यावरणाला बनवा धनवान’ अशा घोषणा देण्यात आल्या.

या प्रसंगी प्रशालेतील शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी प्लास्टिक मुक्त पर्यावरण करण्याची शपथ घेतली. यावेळी शालेय पर्यावरण मंडळाने विद्यार्थ्यांनी आपल्यातील दुर्गुणांचा नाश करून सदगुणांचा अवलंब व अनुकरण करण्याचे आवाहन केले. होळीसाठी जंगल साधन संपत्तीचा नाश न करता संवर्धन करून पर्यावरण पूरक होळी करण्याचे मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी शालेय परिसराची स्वच्छता करून गोळा केलेल्या कचर्‍याची होळी केली.

या कार्यक्रमाकरिता ज्युनिअर व माध्यमिक विभागातील सर्व विभागाचे विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Spread the love