फलटणमध्ये ‘महाराष्ट्राचे भाग्यविधाते’ स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

। लोकजागर । फलटण । दि. ११ मार्च २०२६ ।

महाराष्ट्र साहित्य परिषद (शाखा फलटण) आणि महात्मा एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे भाग्यविधाते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम गुरुवार, दिनांक १२ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता फलटण येथील गजानन चौकातील खजिना हौदाजवळ असलेल्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयात संपन्न होणार आहे.

या अभिवादन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा फलटणचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ भूषविणार असून, फलटणचे ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांची प्रमुख पाहुणे म्हणून विशेष उपस्थिती लाभणार आहे. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या वैचारिक वारशावर प्रकाश टाकण्यासाठी बारामती येथील प्रसिद्ध ग्रामीण कथाकार व लेखक रवींद्र कोकरे आणि यशवंतराव चव्हाण हायस्कूलचे वक्ते गोविंद वाघ हे प्रमुख वक्ते म्हणून आपले विचार मांडणार आहेत.

महाराष्ट्र साहित्य परिषद आणि महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले असून, फलटणमधील नागरिकांनी व साहित्य प्रेमींनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्नेहांकित आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Spread the love