रयत प्रज्ञाशोध परीक्षेत धुळदेव विद्यालयाचे दैदिप्यमान यश; कु. स्वरा महामुनी शिष्यवृत्तीधारक

विद्यालयाचा एकूण निकाल ८३.३३ टक्के; यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे सर्वस्तरातून अभिनंदन.

। लोकजागर । धुळदेव । २९ मार्च २०२६ ।

रयत शिक्षण संस्था, सातारा यांच्या कर्मवीर विद्याप्रबोधिनी अंतर्गत घेण्यात आलेल्या ‘रयत प्रज्ञाशोध परीक्षेत’ श्रीमान शेठ धन्यकुमार रतनचंद गांधी विद्यालय, धुळदेव (ता. फलटण) येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेत विद्यालयातील कु. स्वरा सचिन महामुनी हिने १४२ गुण प्राप्त करून शिष्यवृत्ती मिळवली आणि विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

या प्रतिष्ठेच्या परीक्षेसाठी विद्यालयातील एकूण ३० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, त्यापैकी २५ विद्यार्थी यशस्वीरीत्या पात्र ठरले आहेत. विद्यालयाचा एकूण निकाल ८३.३३ टक्के लागला असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रज्ञाशोध परीक्षेत मारलेली ही बाजी कौतुकास्पद ठरत आहे. विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख अभय गावडे यांच्यासह मार्गदर्शक शिक्षक सचिन अभंग, फडतरे सर, यादव सर, परमाळे मॅडम, लव्हाटे मॅडम आणि जगदाळे मॅडम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक श्री. मोरे व्ही. ए., रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्या सौ. प्रतिभाताई शिंदे, तसेच स्कूल कमिटी सदस्य चंद्रकांत जाधव, हरीभाऊ माने, व्यंकटराव दडस आणि दत्तात्रय भिवरकर सर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे आणि परिश्रम घेणाऱ्या शिक्षकांचे विशेष अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Spread the love