धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा

। लोकजागर । मुंबई । दि. ०५ मार्च २०२५ ।

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर ८२ दिवसानंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिला असल्याचे वृत्त पुढे येत आहे.

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. काल संतोष देशमुख यांच्या हत्त्येच्या वेळेचे क्रुर फोटोग्राफ्स माध्यमांमधून प्रसिद्ध झाल्यानंतर व तत्पूर्वी सी.आय.डी. ने धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिकआण्णा कराड याला या हत्याकांडातील मुख्य आरोपी केल्यानंतर राजीनाम्याची मागणी जोर धरु लागली होती.

ऐन राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी एका मंत्र्याला हत्याकांडाच्या घटनेमुळे मंत्रिपदावरुन पायउतार व्हावे लागले असल्याने सत्ताधार्‍यांसाठी हा धक्का मानला जात आहे.

Spread the love