कै. विक्रम हाडके यांना सामाजिक उपक्रमातून कुटूंबियांकडून आदरांजली
। लोकजागर । फलटण । दि. ८ मे २०२५ ।
गजानन चौक, फलटण येथील सुप्रसिद्ध रुपाली भेळ सेंटरचे प्रमुख कै. विक्रम हाडके यांचा जन्मदिन त्यांचे सुपुत्र गणेश हाडके व कुटूंबियांनी कुरवली (ता.फलटण) येथील ओंकार वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसमवेत साजरा केला. यातून आपल्या कुटूंबप्रमुखाला सामाजिक उपक्रमातून आदरांजली वाहण्याचा आगळा – वेगळा आदर्श हाडके कुटूंबियांनी समाजासमोर मांडला.

कै. विक्रम हाडके यांच्या जन्मदिनानिमित्त हाडके कुटूंबियांनी वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांकरिता भोजन व्यवस्था केली होती. या उपक्रमाबद्दल वृद्धाश्रमातील सर्वांनी हाडके कुटूंबियांचे कौतुक करुन त्यांना आशीर्वाद दिले.
यावेळी गणेश हाडके, श्रीमती नंदा हाडके, सौ. शिवांजली हाडके, नातू चि.मल्हार हाडके, अजिंक्य राऊत उपस्थित होते.