कै.हणमंतराव पवार यांचा स्मृतीदिन संपन्न
| लोकजागर | फलटण | दि. २५ जुलै २०२५ |
सहकार क्षेत्रामध्ये कै. हणमंतराव पवार यांचे असणारे योगदान व त्यामुळे ते ज्या सहकारी संस्थांमध्ये कार्यरत होते त्या सहकारी संस्थांचा झालेला विकास फलटण तालुक्यातील सहकारी संस्थांना आजही प्रेरणा देणारा, नवीन उर्जा देणारा आहे. श्रीराम बझारच्या माध्यमातून असंख्य ग्राहक, सभासद तसेच कामगार यांचे हित जोपासनेचे काम विद्यमान संचालक मंडळ करत आहे, असे प्रतिपादन श्रीराम बझारचे माजी चेअरमन तथा ज्येष्ठ संचालक महादेवराव पवार यांनी केले.

श्रीराम बझारचे संस्थापक सहकार महर्षी कै. हणमंतराव दि. पवार (आण्णा) यांच्या 28 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांचे जन्मगावी पवारवाडी (आसू) व श्रीराम बझार मुख्य कार्यालय, फलटण येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले होते. पुण्यस्मरण दिनानिमित श्रीराम बझार मुख्य कार्यालय, फलटण येथे मान्यवरांचे हस्ते कै. हणमंतराव पवार (आण्णा) यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, दीपप्रज्वलननाने कार्यक्रमांचे व रक्तदान शिबिराचे उद्घाटन करणेत आले. त्याप्रसंगी महादेवराव पवार बोलत होते.

याप्रसंगी श्रीराम बझारचे चेअरमन जितेंद्र पवार, व्हाईस चेअरमन दिलीपसिंह भोसले, सदगुरु हरीबुवा महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन तेजसिंह भोसले, फलटण तालुका भाजप उपाध्यक्ष अमोल सस्ते, ग्रामपंचायत पवारवाडी (आसू) सरपंच महादेवराव पवार, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन व बझारचे संचालक नितीन भोसले, संचालक रविंद्र बेडकिहाळ, राजाराम फणसे, मारुती गावडे, बापूराव गावडे, आनंदराव बेलदार, चंद्रकांत शिंदे, जयकुमार शिंदे, शितल अहिवळे, सुभाष कर्णे, तुषार गांधी, आनंदराव शिंदे, महादेव पोकळे, संचालिका श्रीमती प्रभावती गरुड आदी मान्यवर उपस्थित होते.

दिलीपसिंह भोसले यांनी सहकार क्षेत्रातील आण्णांचे गौरव कार्य व त्या कार्याचा आदर्श घेवून श्रीराम बझारचे सामजिक कार्य उल्लेखनीय असलेचे सांगितले.
पुण्यस्मरण दिनाचे औचीत्य साधून याप्रसंगी सहकार महर्षी कै. हणमंतराव हायस्कूलचे विद्यार्थी, आनंदवन प्राथमिक विद्यामंदिर विद्यार्थी, श्रीराम विद्याभवन मराठी प्राथमिक शाळा, ज्योतिर्लिंग विद्यालय, आसू पवारवाडी, आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालय तसेच श्रीराम बझारचे सेवक पाल्य यांना गुणवंत विद्यार्थी पुरस्काराने सन्मानित करणेत येवून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करणेत आले. तसेच उत्तम कामकाज असलेल्या बझारच्या शाखांना उत्तम शाखा पुरस्कार व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. त्यामध्ये प्रथम क्रमांक-शाखा-मलठण, द्वितीय क्रमांक-शाखा-तरडगाव, तृतीय क्रमांक-शाखा-दहिवडी, चौथा क्रमांक-शाखा-महात्मा फुले शॉपिंग सेंटर फलटण, व पाचवा क्रमांक-अनुक्रमे शाखा-कोळकी व शाखा-शिरवळ या शाखांचा समावेश आहे. आदर्श कामकाज असलेल्या सेवकांमध्ये सीताराम महादेव झेंडे यांना आदर्श सेवक व सौ. वनिता दिलीप माने यांना आदर्श सेविका पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे रक्तदान शिबिरास फलटण व पंचक्रोशीतील 102 नागरिकांनी उत्सुफुर्तपणे रक्तदान केले. उपस्थित रक्तदात्यांना श्रीराम बझारच्या वतीने भेटवस्तू देवून सन्मानित करण्यात आले. रक्त संकलन कामी फलटण ब्लड बँकेचे कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले.
प्रारंभी श्रीराम बझारचे जनरल मॅनेजर अनंत पाटील यांनी प्रास्तविक केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये संस्थेची सर्वसाधारण माहिती, संस्थेचे सभासद ग्राहक यांचे आर्थिक फायद्यासाठी संस्था करीत असलेले कार्य, सामजिक कार्यामधील संस्थेचा सहभाग याबाबत उपस्थितांना माहिती दिली.
त्यांनतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत संचालक आनंदराव बेलदार यांनी केले.
आभार संस्थेचे ज्येष्ठ संचालक मारुती गावडे यांनी मानले.
कार्यक्रमास सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर व बझारचे ग्राहक, सभासद, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.