फलटण उपजिल्हा रुग्णालयात डॉ. संपदा मुंडे यांचा पुतळा उभारणार : आ. श्रीमंत रामराजे

। लोकजागर । फलटण । दि. 30 ऑक्टोबर 2025 ।

‘‘ महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामुळे 1200 वर्षांच्या फलटणच्या इतिहासाला काळिमा फासला गेला आहे. हा कलंक पुसून कसा काढायचा? हा आपल्यापुढे प्रश्‍न आहे. डॉ. संपदा मुंडे यांची हत्या आहे की आत्महत्या हे तपासात पुढे येईल. मुख्यमंत्री फडणवीसांवर आपला विश्‍वास आहे. परंतु या प्रकरणामुळे फलटणचे, नाईक निंबाळकर ब्रँडचे नाव कमी झाले आहे. हा काळीमा पुसून टाकण्यासाठी डॉ. संपदा मुंडे यांचा हुतात्मा दिन आपल्याला प्रत्येक वर्षी साजरा करावा लागेल. फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात त्यांचा पुतळा उभा करण्याची मागणीही आपण सरकारकडे करणार आहे. यातून सगळे नाईक निंबाळकर सारखे नाहीत असा संदेशही बाहेर जाईल’’, अशा भावना महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केल्या.

साखरवाडी (ता.फलटण) येथील एका जाहीर कार्यक्रमात आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते.

‘‘इथून पुढे आपण भाऊबीज साजरी करणार नाही. जर सरकारने डॉ. संपदा मुंडेंचा पुतळा बसवला नाही तर तो मी माझ्या खर्चाने उभारणार आहे’’, असेही आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

Spread the love