अरविंद मेहता यांच्या वाढदिवसानिमित्त ‘माळजाई’ परिसर सुशोभीकरणाचा शुभारंभ

। लोकजागर । फलटण । दि. १० फेब्रुवारी २०२५ ।

येथील ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लायन्स क्लब संचलित माळजाई देवी उद्यान परिसर समितीतर्फे माळजाई परिसर सुशोभीकरणाचा शुभारंभ संपन्न झाला. यावेळी माळजाई मंदीर परिसरात अरविंद मेहता व उपस्थितांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.

कार्यक्रमास माळजाई उद्यान समितीचे चेअरमन प्रमोद निंबाळकर, सचिव विजय लोंढे पाटील, खजिनदार महेशशेठ गरवालीया, लायन्स हॉस्पिटलचे चेअरमन अर्जुन घाडगे, लायन्स हॉस्पिटलचे सचिव चंद्रकांत कदम, सुहास निकम , राजीव नाईक निंबाळकर, दिलीपराव शिंदे, प्रीतम शिंदे, स्वीकार मेहता व विकास जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

Spread the love