। लोकजागर । क्रीडा जगत । दि. ०९ मार्च २०२५ ।
आय.सी.सी. चँपियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात आज भारताचा सामना न्यूझीलंड संघाशी दुबई येथे होत असून क्रिकेटचा चँपियन कोण ठरेल याबद्दल क्रिकेट रसिकांमध्ये उत्कंठा शिगेला पोचली आहे.

बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव करुन भारतीय संघ तर दक्षिण अफ्रिकेचा पराभव करुन न्यूझीलंडचा संघ अंतिम फेरीत धडकला आहे.
स्पर्धेच्या साखळी फेरीत भारताने न्यूझीलंडला पराभवाची धूर चाखली असली तरी दक्षिण अफ्रिकेविरोधात दणदणीत विजय मिळवलेला न्यूझीलंडचा संघही फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात तगडा आहे. भारतीय संघातील स्टार खेळाडू रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या, मोहम्मद शमी, कुलदीप यादव या प्रमुख खेळाडूंच्या चांगल्या कामगिरीवर भारतीय संघाची भिस्त अवलंबून राहणार आहे. सामन्याची सुरुवात दुपारी 2:30 वाजल्यापासून होणार असून रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारतीय संघ या स्पर्धेत अजिंक्य ठरेल या अपेक्षेसह करोडो भारतीय क्रिकेट रसिकांच्या नजरा या सामन्याकडे लागल्या आहेत.