। लोकजागर । फलटण । दि. १४ मार्च २०२५ ।
श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान फलटण विभाग यांच्यावतीने उद्या, शनिवार दिनांक १५ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ६ : ०० वाजता महाराजा मंगल कार्यालय येथे गजानन महाजन गुरुजी यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

गजानन महाजन गुरुजी हे मुळचे इचलकरंजी येथील असून स्वच्छतेविषयी त्यांचे मोठे सामाजिक योगदान आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेवून इचलकरंजी नगरपालिकेने त्यांना ‘स्वच्छतादूत’ ही पदवी बहाल केलेली आहे. त्याचबरोबर गजानन महाजन हे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह महापुरुषांच्या कार्याचा जागर करुन निकोप समाजनिर्मितीसाठी सतत झटत असतात.
तरी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच चरित्र जगावं कसं आणि त्यांनी दिलेले बलिदान काय आहे हे ऐकण्यासाठी परिसरातील सर्व शिव – शंभू प्रेमींनी या व्याख्यानास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान फलटण विभाग यांच्यावतीने करण्यात आले आहे.