फलटण तालुक्याच्यावतीने एकच भव्य – दिव्य शिवजयंती साजरी करण्याचा निर्धार

। लोकजागर । फलटण । दि. ०४ एप्रिल २०२५ ।

वैशाख शुद्ध द्वितीयेला परंपरेप्रमाणे साजरी होणारी शिवजयंती यंदा सर्व गट – तट बाजूला ठेवून एकच भव्य दिव्य स्वरुपात साजरी करण्याचा निर्धार करण्यात आला असून येत्या 29 एप्रिल रोजी साजर्‍या होणार्‍या या शिवजयंती उत्सवामध्ये शिवभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समितीच्या पार पडलेल्या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज यांची जंयती एकच साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शिवजयंती सार्वजनिक स्वरूपात भव्य आणि दिव्य स्वरुपात साजरी होणार आहे.

दरम्यान, या सोहळ्यासाठी शिवजयंती उत्सव समितीची स्थापन करण्यात आली असून दिनांक 29 एप्रिल रोजी भव्य स्वरूपात शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी समिती कामाला लागली असून या समितीला फलटण तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवजयंती निमित्त छापण्यात आलेल्या पावती पुस्तकाचे पूजनही करण्यात आले आहे. यावेळी फलटण शहरातील प्रमुख सार्वजनिक मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Spread the love