। लोकजागर । फलटण । दि. ०७ मे २०२५ ।
माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशिल मोहिते – पाटील आज बुधवार, दि. ७ मे रोजी फलटण दौर्यावर येत असून या दौर्यात तालुक्यातील पूर्व भागातील गावांना ते भेटी देणार आहेत.

या दौर्यात सकाळी ११ वाजता मुंजवडी, दुपारी १२ वाजता आसू येथे हॉकी, राष्ट्रीय खेळाडू शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंचा सत्कार, दुपारी १ वाजता पवारवाडी येथे जितेंद्र पवार यांच्या निवासस्थानी भेट, दुपारी २ वाजता गोखळी येथे निरा उजवा कालव्याविषयी डॉ. शिवाजी गावडे यांच्या निवासस्थानी चर्चा, दुपारी ३ : ३० वाजता विडणी येथे राजेंद्र पवार यांच्या निवासस्थानी, तर दुपारी ४ : ३० वाजता फलटण येथे शासकीय विश्रामगृहावर महाविकास आघाडी पदाधिकार्यांसमवेत बैठक असे कार्यक्रम पार पडणार आहेत.
महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या भागातील दौर्यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.