। लोकजागर । फलटण । दि. ११ मे २०२५ ।
येथील संत रोहिदास चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने आज रविवार, दिनांक 11 मे रोजी सकाळी 10 ते 4 या वेळेत चर्मकार समाज वधू – वर व पालक परिचय महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा मारवाड पेठ, फलटण येथील नवलबाई मंगल कार्यालयात संपन्न होणार असून या महामेळाव्यात समाजातील वधू – वर व पालकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष भोलेनाथ भोईटे यांनी केले आहे.

सदर मेळाव्यात सातारा, कोल्हापूर, पुणे, सांगली, मुंबई, अहमदनगर, सोलापूर आदी जिल्हे समाविष्ट करण्यात आले आहेत. मेळाव्यास येताना वधू / वरांचा चार बाय सहा इंच आकारातील फोटो, संपूर्ण माहिती व नाममात्र नोंदणी शुल्क सोबत आणण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
सदर मेळाव्या यशस्वी करण्यासाठी संत रोहिदास चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव हृदयनाथ भोईटे, उपाध्यक्ष अरुण खरात, चर्मकार वधू – वर सूचक केंद्र समिती, फलटणचे अध्यक्ष प्राचार्य विठ्ठल हंकारे, सचिव कृष्णात बोबडे, अरुण शिंदे (सातारा) परिश्रम घेत आहेत.