‘ब्रिलियंट अकॅडमी’ दहावी  निकालात अव्वल

| लोकजागर | फलटण | दि. १७ मे २०२५ |

फलटण येथील श्री सद्गुरु प्रतिष्ठान संचलित  ब्रिलियंट अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल चा मार्च २०२५ माध्यमिक शालांत परीक्षा चा निकाल १०० टक्के लागला असून १५ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले तसेच प्रथम श्रेणीमध्ये १० विद्यार्थी व  द्वितीय श्रेणीमध्ये ०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

विद्यालयातील श्रावणी सचिन सस्ते या विद्यार्थिनीने  ९२.२०% टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक तर रोहन बापी मजुमदर याने ८९.२० टक्के गुण मिळवून दुसरा व  धनश्री राहूल तेली या विद्यार्थिनीने ८८.२० टक्के गुण प्राप्त करून तिसरा क्रमांक मिळवला .

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले, चेअरमन ऍड. सौ. मधुबाला भोसले, सेक्रेटरी रणजितसिंह भोसले , प्रशासकीय संचालिका सौ. प्रियदर्शनी भोसले, सर्व संचालक व प्रशालेच्या प्राचार्या सौ .नाझनीन शेख,  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच शाळा पालक शिक्षक समिती आदींनी अभिनंदन केले.

Spread the love