। लोकजागर । फलटण । दि. २२ मे २०२५ ।
श्रीराम एज्युकेशन सोसायटी, फलटणचे सौ.वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटणच्या विद्यार्थिनींनी सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्ड परीक्षेमध्ये उज्ज्वल यश संपादन केले आहे.

कन्याशाळा इयत्ता बारावी कला शाखेचा निकाल ८७.१४% हा फलटण शहरातील सर्वाधिक निकाल आहे, तर इयत्ता दहावीचा निकाल ९६.३४% लागला आहे. एच. एस. सी. परीक्षा २०२५ मध्ये प्रथम क्रमांक कु. माने भाग्यश्री शेखर (७६.००%) द्वितीय क्रमांक कु. मदने मेघा शामराव (७३.८३%) व तृतीय क्रमांक कु. धायगुडे शिवांजली नानासो (७२.३३%) यांनी मिळवून उज्ज्वल यश संपादन केले.
एस. एस. सी. परीक्षा २०२५ मध्ये प्रथम क्रमांक कु. शेख फिजा फिरोज (९०.२०%) द्वितीय क्रमांक कु. आटोळे प्रगती बाळासो (९०.००%) तृतीय क्रमांक कु. निषाद रोशनी मेवालाल (८९.८०%) यांनी मिळवून उज्ज्वल यश संपादन केले.
सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या अध्यक्षा श्रीमती सविताकाकी सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), ऑनररी जनरल सेक्रेटरी डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके), नियामक मंडळाचे सदस्य महेंद्र सूर्यवंशी बेडके, सौ. ज्योती सूर्यवंशी (बेडके), नियामक मंडळाचे उपाध्यक्ष बापूसाहेब मोदी व सी. एल. पवार, नियमक मंडळाचे सर्व सदस्य तसेच प्रशालेच्या प्राचार्या सौ. व्ही. के. सुरवसे , पर्यवेक्षिका, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.