| लोकजागर | फलटण | दि. २५ मे २०२५ |
महाराष्ट्र व मध्यप्रदेश या दोन राज्यात नावाजलेले मराठी हिंदी दैनिक अहिल्याराज वर्धापन दिन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त आयोजित इंडियन एक्सलन्स अवार्ड २०२५ साठी फलटण येथील विनायक शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी विनायक शिंदे यांना हा अवार्ड प्रदान करण्यात येणार आहे.

दैनिक अहिल्याराज वृत्तपत्राद्वारे सामाजिक उपक्रमाचा भाग म्हणून विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार करण्यासाठी इंडियन एक्सलन्स अवार्ड २०२५ चे आयोजन करण्यात येते. यामध्ये फलटण येथील पत्रकार विनायक शिंदे यांची पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल इंडियन एक्सलन्स अवार्डसाठी निवड करण्यात आली असून १ जून २०२५ रोजी मलकापूर (बुलढाणा) येथे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.