मंत्री जयकुमार गोरे आज फलटण दौर्‍यावर

। लोकजागर । फलटण । दि. 6 जून 2025 ।

श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री ना. जयकुमार गोरे आज शुक्रवार दिनांक 6 जून 2025 रोजी फलटण दौर्‍यावर येत आहेत.

पालखी तळाची पाहणी करण्यासाठी आयोजित केलेल्या या दौर्‍यात दुपारी 4 : 15 वाजता बरड, 4 : 45 वाजता फलटण, सायंकाळी 5 : 35 वाजता तरडगांव येथील पालखी तळांना ना. जयकुमार गोरे भेट देवून पाहणी करणार आहेत.

फलटण तालुक्यातील पाहणी दौरा संपवून ना. जयकुमार गोरे लोणंद येथील पालखी तळ व निरा येथील दत्तघाटाची पाहणी करुन पुण्याकडे रवाना होणार आहेत.

Spread the love