। लोकजागर । फलटण । दि. 8 जून 2025 ।
महाराष्ट्र शासनाच्या वतीने सामाजिक कार्याबद्दल दिला जाणारा यावर्षीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार फलटण येथील अशोक कांबळे यांना नुकताच जाहीर करण्यात आला आहे.

अशोक कांबळे यांनी गेली तीस ते पस्तीस वर्ष सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

कांबळे यांनी राष्ट्रीय चर्मकार संघाचे जिल्हाध्यक्ष म्हणून सात वर्ष काम केले आहे. सध्या ते राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत आहेत. तसेच त्यांनी बँक ऑफ इंडिया येथेही चांगली सेवा देवून ते सेवानिवृत्त झाले आहेत.

या पुरस्काराबद्द्ल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
